१. आपल्या खात्यावर होणाऱ्या व्यवहारांची माहिती मोबाईल वर SMS व्दारे तात्काळ प्राप्त करण्याकरीता कृपया आपल्या मोबाईल क्रमांकाची शाखेत नोंदणी करावी.
२. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार आमच्या बँकेने ३१ मार्च चे स्तरावर दावा न केलेल्या ठेवींची रक्कम RBI च्या "डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF)" मध्ये हस्तांतरित केली आहे. जर कोणत्याही ग्राहकाला असे वाटत असेल की त्यांच्या ठेवी DEAF मध्ये हस्तांतरित केल्या आहेत तर कृपया सूचीमध्ये तुमचे नाव शोधा. तुमचे नाव आढळल्यास अधिक माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा.
३. ग्राहकांनी त्यांचे केवायसी अद्यावत असल्याची खात्री करावी, नसल्यास आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता करून केवायसी तात्काळ अद्यावत करून घ्यावी.
४. ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करावे.
५. आपला पत्ता / मोबाईल क्रमांक / ई-मेल आयडी अथवा इतर माहिती बदलल्यास तात्काळ बँकेस कळवावे.